Ad will apear here
Next
ब्रिटिशकालीन दुर्मीळ ग्रंथ, गॅझेटिअर्सचा खजिना खुला
सेतुमाधवराव पगडी संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन
सेतुमाधवराव पगडी संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले. या वेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक डॉ. दिलीप बलसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबई : राज्य शासनाच्या दर्शनिका (गॅझेटिअर) विभागामार्फत इतिहास संशोधक दिवंगत सेतुमाधवराव पगडी यांच्या नावाने संदर्भ ग्रंथालय सुरू करण्यात आले असून, दीडशे वर्षांपासूनचे साडेतीन हजार दुर्मीळ ग्रंथ, जिल्हा गॅझेटिअर्सही येथे आहेत. याचे उद्घाटन मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाले.

सेतुमाधवराव पगडी
फोर्ट येथील दर्शनिका विभागामध्ये आयोजित या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ. दिलीप बलसेकर, दर्शनिका विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दर्शनिका विभागाच्या कार्यालयात ब्रिटिश काळापासून संदर्भासाठी वापरण्यात आलेले अनेक ग्रंथ; तसेच १८८० मध्ये ब्रिटिशांनी तयार केलेली अनेक जिल्हा गॅझेटिअर्सही आहेत. त्यामध्ये १८०९ मधील महिकावती उर्फ माहीमच्या बखरीची प्रत, १८८६मध्ये प्रकाशित झालेला ‘राऊंड अबाऊट बॉम्बे’ हा ग्रंथ, १८८९चा पाचव्या इंडियन काँग्रेसचा रिपोर्ट यासह असंख्य दुर्मीळ ग्रंथांचा समावेश आहे. हा सगळा खजिना आता अभ्यासक, संशोधकांना खुला झाला आहे. 

‘या ग्रंथालयातील जवळपास दीडशे वर्षांपासूनचे ग्रंथ अभ्यासक-संशोधकांना उपलब्ध होणार आहेत. दर्शनिका विभागाच्या अखत्यारितील संदर्भ अभ्यासक-संशोधकांसाठी महत्त्वाचे ठरतील’, असे मत विनोद तावडे यांनी या वेळी व्यक्त केले. 

‘या संदर्भ ग्रंथालयात साडेतीन हजारांहून अधिक मौलिक व दुर्मीळ ग्रंथ उपलब्ध आहेत. इतिहास संशोधक दिवंगत सेतुमाधवराव पगडी यांच्या १०९व्या जन्मदिनी हे संदर्भ ग्रंथालय सुरू होत आहे, याचा आनंद आहे. १९६० ते १९७० अशी १० वर्षे सेतुमाधवराव पगडी हे या दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा गॅझेटिअर्सचे काम मोठ्या प्रमाणावर झाले. पगडी यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासक्षेत्रात दिलेले योगदान मोठे आहे. बहुभाषाकोविद ही त्यांची ओळख होती. त्यांना मराठीबरोबरच इंग्रजी, उर्दू, फार्सी, तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषा अवगत होत्या. सेतुमाधवरावांची ही महत्ता आणि योग्यता लक्षात घेऊनच त्यांचे नाव ग्रंथालयाला देण्यात आले आहे,’ असेही तावडे यांनी नमूद केले. 

(सेतुमाधवराव पगडी यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZPSCD
Similar Posts
पंतप्रधानांच्या हस्ते २५ रुसा प्रकल्पांचे डिजिटल उद्घाटन मुंबई : ‘भारतीयांचे जीवन सुसह्य आणि सुखकर होण्यासाठी केंद्र शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. राष्ट्रावर कोणतीही आपत्ती किंवा कठीण परिस्थिती ओढावल्यास तत्परतेने एकमेकांना मदतीचा हात देऊन आपल्याला लाभलेल्या संसाधनांची जपणूक करणे ही भारताच्या प्रगतशील मार्गाची शक्ती आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले
वैभवशाली फ्लोरा फाउंटनचा स्थापत्य इतिहास आणि कलासौंदर्य ब्रिटिशकालीन मुंबईत उभारल्या गेलेल्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण इमारतींपैकीच एक म्हणजे फ्लोरा फाउंटन. १८६९मध्ये सुरू झालेले हे कारंजे अलीकडे काही काळ बंद होते. यंदाच ते पुन्हा सुरू करण्यात आले आहे. ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर बुरांडे यांनी या फ्लोरा फाउंटनचा स्थापत्य इतिहास आणि कलासौंदर्य या दृष्टीने घेतलेला हा आढावा
असामान्य धैर्य दाखवणाऱ्या शूरांचा तावडे यांच्या हस्ते गौरव मुंबई : प्रसंगावधान राखून स्वतःच्या जीवाची, कुटुंबाची, काळजी न करता समोर अडकलेला माणूस आपला कुटुंबीय आहे, असे मानून त्यांच्या संरक्षणासाठी धावून गेलेल्या धैर्यवानांचे मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी कौतुक केले.
महाराष्ट्रातील निवडक संग्रहालये पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी, इतिहास-संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी, या इतिहासातील नोंदी सुसंगत पद्धतीने मांडण्याची आवश्यकता असते. त्यामुळे संग्रहालयांची भूमिका महत्त्वाची असते. इतिहासातील समाजकारण-राजकारण-संस्कृती समजून घेण्यासाठी संग्राहालयातील शिलालेख, भित्तीलेख, मूर्ती, ताम्रपट, भूर्जपत्रे,

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language